|
Article in other languages:
|
राजकीय नेते
जन्म व कौटुंबीक जीवनवल्लभभाई झवेरभाई पटेल याचा जन्म त्यांच्या मामाच्या घरी नडीयाद - गुजरात येथे झाला.त्यांची अचूक जन्मतारिख द्न्यात नाही, त्यांनी मॅट्रीक परीक्षेवेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ओक्टोबर अशी लिहिली होती.[१] हिंदू धर्मिय पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होत. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होत. त्यांना एक धाकटा भाऊ - काशीभाई व धाकटी बहिण - दहीबा ही होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतात मदत करत असत.[२] १८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२ / १३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मेट्रीकची परीक्षा तुलनेने उशिरा म्हणजे २२ वर्षाचे असताना उत्तीर्ण झाले. [३] इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई वकीलीची परिक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरूवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली - १९०४मध्ये मणीबेन आणि १९०६मध्ये डाह्याभाई. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबोनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले.[४] वल्लभभाई गोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही बघत होते.
Questions for article: स्वतन्त्रे, स्वतन्त्रे भारते, स्वतन्त्रे भारते अयम् |
||||||||||||||||||||
This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.
IHS Europe: Infrared Heating Systems for Home and Business.