सोवियेत संघ

Article in other languages:

Союз Советских Социалистических Республик
Union of Soviet Socialist Republics

सोव्हियेत साम्यवादी गणराज्यांचा संघ
१९२२ - १९९१
Flag of the Soviet Union.svg Coat of arms of the Soviet Union.svg
ध्वज चिन्ह
Union of Soviet Socialist Republics (orthographic projection).svg
जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी मॉस्को
राष्ट्रीय भाषा रशियन
इतर प्रमुख भाषा अनेक
राष्ट्रीय चलन रुबल
क्षेत्रफळ २,२४,०२,२०० वर्ग किमी
लोकसंख्या
घनता–
२९,३०,४७,५७१
प्रती वर्ग किमी
साम्यवाद
Kolkhoznitsa.jpg

मॅनिफेस्टो
मार्क्स · लेनिन

कम्युनिस्ट पक्ष
भाकप · माकप

देशात
सोवियत संघ
चीन
क्युबा
व्हियेतनाम
उत्तर कोरिया
लाओस

सोव्हियेत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हियेत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले. सोव्हियेत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता. या देशाने आशिया खंडाचा १/३ भाग आणि युरोप खंडाचा १/२ भाग व्यापला होता. या देशाच्या सीमा पूर्वेला पॅसिफिक महासागरापर्यंत, पश्चिमेला पोलंड आणि बाल्टिक समुद्रापर्यंत, उत्तरेला आर्क्टिक महासागरापर्यंत आणि दक्षिणेला काळा समुद्र, इराण, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या उत्तर सीमांपर्यंत होत्या. हा देश पूर्व-पश्चिम सुमारे ६,२१५ मैल आणि उत्तर-दक्षिण सुमारे ३,११० मैल पसरलेला होता. पृथ्वीवरील भूपृष्ठाच्या १/६ भागात सोवियेत संघ पसरलेला होता.

भूरचना आणि वनस्प्तीच्या दृष्टीने सोवियेत संघाचे चार भाग पडत. अती उत्तरेच्या फिनलंडच्या सीमेपासून आर्क्टिक समुद्राच्या किनार्‍याने बेरिंग समुद्रापर्यंत पसरलेला टुंड्राचा बर्फाच्छादित प्रदेश ज्यात मुख्यत्वे पाणथळ भाग, दलदलीचा प्रदेश, शेवाळे आणि खुरटी झुडपे यांचे साम्राज्य होते. या भागात मनुष्य वसाहत कमी होती. टुंड्रा प्रदेशाच्या दक्षिणेला तैगाचा अणकुचीदार वृक्षांचा, जंगलाचा प्रदेश होता. हा प्रदेश जगातील सगळ्यात मोठा, सलग अरण्यमय म्हणून ओळखला जात असे. सोवियेत संघातील महत्त्वाची शहरे मॉस्को (उच्चार मस्क्वा), क्यीव (उच्चार कीएव) या भागात होते.

तैगाच्या दक्षिणेस एल्म, ओक या झाडांसह लाकडाची विपुल संपत्तीचा, सुपीक जमिनीचा प्रदेश होता. जगातील सगळ्यात मोठा, सलग, लागवडीखालचा प्रदेश अशी याची ओळख. विविध प्रकारचे कारखने, उद्योग धंदे या भागात होते. या सुपीक भागाच्या दक्षिणेला कोरड्या हवामानाचा, वाळवंटी प्रदेश होता. या भागात अनेक्दा अवर्षण, दुष्काळ असे. येथील प्रमुख पीके तंबाखू, चहा, ऊस, अंजीर, अक्रोड, बांबू, लवंग, निलगीरी ही होती. सोवियेत संघ खूप मोठा देश होता तरी एकूण उपलब्ध क्षेत्राच्या केवळ १/३ जागा लागवडी योग्य होती.

सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती. जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी ओब, येनिसी, लेनाअमूर या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या. मस्क्वा नदीवर वसलेल्या मॉस्कोच्या परिसरातील नद्या ५ समुद्रांशी जोडल्या होत्या. पश्चिमेकडील द्विना नदीद्वारे बाल्टिक समुद्र, द्नीपरडॉन या नद्यांद्वारे काळा समुद्र आणि अझोव समुद्र, वोल्गा नदीने कास्पियन समुद्र तर उत्तरेकडील नद्यांद्वारे श्वेत समुद्र जोडला गेल्याने दळणवळण अतिशय सुलभ झाले होते.

आर्क्टिक समुद्राचा सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता. सुमारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला कास्पियन समुद्राला तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल. सैबेरियातील बैकाल सरोवर जगातील सर्वात खोल सरोवर ठरते.

विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या. देशाच्या नैऋत्येला कार्पेशियन पर्वतरांगा, पूर्व सैबेरियातील व्हर्कोयान्स्क आणि स्तानवोईच्या पर्वतरांगा, दक्षिणेला कॉकेशस पर्वतरांगा, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या सीमांना लागूनच पामीर, तिआनशान आणि अलताई पर्वतरांगा तर युरोपीय आणि आशियाई सोवियेत संघाचे विभाजन करणार्‍या उरल पर्वतरांगा अशा समृद्ध पर्वतरांगा सोवियेत संघास लाभल्या होत्या.

१५ घटक गणराज्ये, २० स्वायत्त गणराज्ये, ८ स्वायत्त प्रदेश व काही छोटे राष्ट्रीय गट मिळून सोवियेत संघ हा देश ओळखला जात होता. त्यातील रशिया राज्य सगळ्यात मोठे होते, सोवियेत संघाच्या सुमारे ७४ % भूभाग रशियाने व्यापला होता. सोवियेत संघात सुमारे १८० राष्ट्रीय गटाचे व सुमारे १२५ भाषा व बोली भाषा बोलणारे लोक होते. देशाचा मुख्य धर्म ऑर्थोडोक्स ख्रिश्चन हा होता. तीन गटात मोडणारे स्लाव वंशाचे लोक (१) ग्रेट रशियन्स - रशियात राहणारे, (२) लिटल रशियन्स - युक्रेन मध्ये राहणारे, (३) व्हाईट रशियन्स - बेलोरशियात राहणारे असे प्रमुख लोक राहत.

विघटन

१९९१ साली सोव्हियेत संघाचे विघटन झाले व १५ गणराज्यांचे रुपांतर खालील १५ स्वतंत्र देशांमध्ये झाले.

ध्वज देश राजधानी सोव्हियेत संघाचा नकाशा
आर्मेनिया ध्वज आर्मेनिया येरेवान
सोव्हियेत संघाचे तुकडे
अझरबैजान ध्वज अझरबैजान बाकु
बेलारूस ध्वज बेलारूस मिन्‍स्‍क
एस्टोनिया ध्वज एस्टोनिया तालिन
जॉर्जिया (देश) ध्वज जॉर्जिया त्बिलिसी
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान अस्ताना
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान बिश्केक
लात्व्हिया ध्वज लात्व्हिया रिगा
लिथुएनिया ध्वज लिथुएनिया व्हिल्नियस
१० मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा चिशिनाउ
११ रशिया ध्वज रशिया मॉस्को
१२ ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान दुशान्बे
१३ तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान अश्काबाद
१४ युक्रेन ध्वज युक्रेन कियेव
१५ उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान ताश्केंत

Questions for article: सोवियेत संघ, sofygue, sofygu'e

This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.


IHS Europe: Infrared Heating Systems for Home and Business.